नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन च्या मुहूर्तावर आज नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात पहाटे प्रभू श्रीराम, लक्ष्मण , सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले .वर्षातील आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो..तिन्ही मूर्तींना सुवासिक तेल उटणे लावून स्नान घालण्यात आले..यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांच्या वतीने तिन्ही मूर्तींवर अभिषेक करण्यात आलं..पहाटे झालेल्या या सोहळ्याने मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले..यंदा कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने सर्व मंदिर देखील उघडण्यात आल्याने भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत आहे.. त्यामुळे भाविक देखील समाधान व्यक्त करत आहेत।