सातपुरमधील ‘तो’ खून राजकीय वादातून

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या सातपूर भागात भाजप मंडल अध्यक्षाच्या खुनातील मुख्य आरोपीला पोलिसांनी तातडणीने सूत्रे फिरवत मुंबई येथून अटक केली आहे. खुनातील आरोपीला तात्काळ अटक करावी. यासाठी नाशिक भाजप आमदार,नेते पदाधिकरी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.त्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची युनियनच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ देखील उडाल्याचे पाहायला मिळाले. घटनेनंतर नाशिक भाजप आमदार ,नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी घटनेतील आरोपींना अटक व्हावी यासाठी सातपूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता, जो पर्यंत आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या सुरूच ठेवणार असल्याची भूमिका भाजप कडून घेण्यात आली होती.

https://youtu.be/4ysuMvVjFoc

यानंतर गुन्हे शोध पथकाने तात्काळ सूत्रे फिरवत तपासाला सुरवात केली. शोध पथक मुंबई येथे रवाना होवुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा कल्याण ते मुंबा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून शोध घेतला असता तपास पथकास गुंगारा देवुन पळुन जाण्याच्या बेतात असताना तपास पथकाने सदर आरोपीला शिताफीने अटक केली आहे. अवघ्या ०६ तासाच्या आत या खुनातील मुख्य सुत्रधार विनोद उर्फ विनायक बर्वे यास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हयाचे घटने बाबत मयताचे नातेवाईक यांनी फिर्याद दिल्याने सातपुर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचा पुढील तपास सातपुर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे हे करत आहे.असे असले तरी मात्र शहरात दुसरीकडे गेल्या चार दिवसात 3 खुनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.