नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या RTO ऑफिस समोर भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली असून आर्थिक देवाण घेवाणीच्या जुन्या वादातून हि हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, यामध्ये एका विविधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे.
राजेश वकील शिंदे या इसमाचा दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने घरी जात असतांना रात्री साडेदहा ते १ वाजे दरम्यान अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खुनाच्या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची चक्रे फिरवून शिर्डी येथून रवी मधुकर यलमामे आणि एक विधी संघर्षित बालक या दोहा संशयितांना अटक केली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीवाणीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून हि हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अवघ्या २४ तासाच्या आत पोलिसांनी या संशयित आरोपींना अटक केली असून पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.