Home » हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

हिंगणघाट जळीतकांडात आरोपी विकेश नगराळे याच्यावर न्यायालयाने बुधवारी खुनाचा गुन्हा सिद्ध केल्यानंतर आज न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर समाजमन संतप्त होऊन रस्त्यावर आले होते. मोर्चे, आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. हिंगणघाट जळीतकांडाचा बुधवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने विकेश नगराळेला दोषी ठरवत गुरुवारी शिक्षा जाहीर होणार असल्याचे म्हटलं. खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याच्या दिवशीच शिक्षा सुनावली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. त्यामुळे आज आरोपी विकेश नगराळेला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने आरोपी विक्की नगराळेला शिक्षा सुनावल्यानंतर पिडीतेला न्याय मिळाल्याचे भावना व्यक्त होत आहे. तसंच, आज पीडितेचा स्मृतीदिन असल्याने आजच्याच दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावल्यामुळं पिडीतेच्या आई- वडिलांना भावना अनावर झाल्या होत्या.

काय घडले होते?

पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावर महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!