Home » राहुल गांधींच्या शरीरातील रक्त हे इटलीचे : आचार्य तुषार भोसले

राहुल गांधींच्या शरीरातील रक्त हे इटलीचे : आचार्य तुषार भोसले

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) हल्लाबोल केला आहे.

दरम्यान तुषार भोसले यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींनी नाकारलेल्या रुद्राक्ष माळेवरून (Rudraksh Mal) सडकून टीका केली आहे. ते या व्हिडिओत म्हटले आहे कि, ‘शेवटी हे सिद्धच झाले कि, राहुल गांधींच्या शरीरातील रक्त हे हिंदुस्थानाचे नाही तर इटलीचे (Italy) आहे. अशा इटालियन डीएनए असलेल्या राहुल गांधींनी भगवान शंकराच्या प्रिय अशा तसेच तमाम हिंदू धर्माच्या (Hindu ) पवित्र अशा रुद्राक्ष माळेला नाकारलेले आहे, फक्त निवडणूक (Elections)आल्या कि हिंदू समाजाप्रती ढोंगी प्रेम दाखवायचं अन निवडणूका संपल्या कि हिंदुत्वाविषयी आणि हिंदूंविषयी यांना द्वेष निर्माण होतो.

ते पुढे म्हणाले कि, ‘याच ठिकाणी एखादी व्यक्ती जाळीची टोपी नेली असती तर डोकं टेकवून त्यांनी ती घातली असती, पण त्यांच्यातला हिंदू समाजाविषयीचा द्वेष या घटनेने पूर्णपणे उघड पडला आहे. राहुल गांधींनी एक गोष्ट कान उघडून ऐकावी, आज त्यांनी आमच्या पवित्र अशा रुद्राक्ष माळेला नाकारलं, येणाऱ्या दिवसांत हिंदुस्थानाची जनता इटालियन डीएनए असलेल्या राहुल गांधींना आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला (Congress Party) नाकारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

यापूर्वी देखील आचार्य तुषार भोसले हे चर्चेत आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांशी वाद घातल्याचे दिसून येते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!