Home » एसटी महामंडळ आक्रमक, नाशिकमधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

एसटी महामंडळ आक्रमक, नाशिकमधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमधून (Nashik) संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Employees) बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक विभागातून ३७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. असे असूनही कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एसटी महामंडळ कठोर पाऊले उचलत आहेत.

गेल्या ६४ दिवसांपासून एसटी चा संप (ST Workers Strike) सुरूच असून अद्यापही विलीकरणाचा लढा सुटलेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळ (ST Corporation) प्रशासन कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करीत आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस (Bad Action Notice) पाठवत आहे. नाशिक विभागातून (Nashik Division) बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने ३७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर नाशिक विभागातील ४४९ कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. मात्र अद्यापही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

दरम्यान नाशिक विभागातून साडेचारशे च्या आसपास कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात ३७ जणांना बडतर्फ़ करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या म्हणण्यानुसार निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीलाही (Court Hearing) हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. मात्र तरी देखील प्रतिसाद मिळत नसल्याने, नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात ३७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली आहे.

तर विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात नाशिकमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी आहेत. मात्र प्रशासनाने आता बडतर्फीची धडक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतरही कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात येणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!