Home » पोर्तुगालहुन नाशकात आलेल्या पती-पत्नीने चिंता वाढवली

पोर्तुगालहुन नाशकात आलेल्या पती-पत्नीने चिंता वाढवली

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे प्रशासन ओमायक्रोनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर खबरदारी घेत असताना दुसरीकडे परदेशातून (Foreigners) आलेले नागरिक धडकी भरवत आहेत. नुकताच पोर्तुगालहुन (Portugal) नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या दोघा पती पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह (corona Positive) आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ओमायक्रॉनचा पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा आरोग्य यंत्रणा (Nashik District Health Department) सतर्क झाली आहे. शहरामध्ये काही दिवसांपूर्वी पोर्तुगाल येथून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती, पत्नी करोना बाधित आढळून आले आहेत. या कुटुंबाचे नमुने पुणे (Pune) येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे (NIV Lab) पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान या दोघांचा ओमायक्रोन संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्या दोघेही पती पत्नी डॉक्टरांच्या निगराणीखाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले आहे. शहरात विविध उपाययोजना राबवण्यात सुरुवात केली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!