Home » सातपूर येथे महापालिकेकडून अतिक्रमण कार्यवाही,उशिरा कि होईना महापालिकेला जाग.!

सातपूर येथे महापालिकेकडून अतिक्रमण कार्यवाही,उशिरा कि होईना महापालिकेला जाग.!

by नाशिक तक
0 comment

नाशिक प्रतिनिधी ;

सातपूर येथील समृद्ध नगर ते बारदान फाटा पर्यंतच्या रस्त्यावर दिवसेंदिवस होणारे अपघात हि बाब लक्षात घेऊन महापालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली.अनेकांचा या रस्त्यावर बळी गेल्यानंतर महापालिकेला उशिरा सुचलेले शहाणपण म्हंटले जात आहे.
नाशिकच्या सातपूर येथील समृद्ध नगर ते बारदान फाटा पर्यंतच्या रस्त्यावर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने अनेक छोट्या मोठ्या अपघातानंतर जाग आल्यावर रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढत कार्यवाही करण्यात आली.याआधी देखील पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी येथील अतिक्रमण काढण्यात आले होते.त्यानंतर आता या ठिकाणी रस्त्यावर अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे,हि बाब लक्षात घेत थेट आता म्हणजेच, पंधरा वर्षानंतर महापालिकेला उशिरा सुचलेले हे शाहनपण म्हणावे लागेल.

पंधरा वर्षांपूर्वी सातपूर विभागाचे तत्कालीन विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध नगर ते बारदान फाटा अशी अतिक्रमण मोहीम करण्यात आली होती.सध्या याच रस्त्यावर महापालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे.आधी अतिक्रमण विभागाकडून रस्ता रुंदीकरण करून नंतर रस्त्यात डिव्हायडर टाकणे अपेक्षित असतांना,आधीच रस्त्यात डिव्हायडर टाकल्याने या ठिकाणी अनेक अपघात होऊन बऱ्याच नागरिकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे आधी अतिक्रमण काढून नंतर रस्ता रुंदीकरण करत रस्त्यात डिव्हायडर टाकले असते तर अनेक नागरिकांचे अपघात न होऊन जीव बचावले असते हे मात्र नक्की.आज या रस्त्यावर पुन्हा एकदा महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती,आज आणि उद्या असे दोन दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!