Home » भुजबळ-सुहास कांदे वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

भुजबळ-सुहास कांदे वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

by नाशिक तक
0 comment

मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून वाद सुरू आहे. या संपूर्ण वादाची दखल आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने या प्रकरणात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येत्या 16 तारखेला नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे या बैठकीत न्यायप्रविष्ट असलेल्या विषयांसंदर्भात निर्णय झाल्यास मी आत्मदहन करेन असा इशारा पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांनी आज दिलय. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार या मुद्द्यावर माझ्यासोबत आहेत असा दावा देखील कांदे यांनी केल्याने भुजबळांची देखील डोकेदुखी वाढणार आहे

. गेल्या अनेक दिवसांपासून कांदे भुजबळ वाद सुरू असल्याने महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही हेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ हे नेमकं काय भूमिका घेतात आणि त्या संपूर्ण भूमिकेकडे कांदे हे कशा पद्धतीने पाहतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हे वाद कशाप्रकारे मिठवतात यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!