संमेलन आणि वाद परंपरा कायम संमेलन नगरीला सावरकरांचा नाव द्या

येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या 94 वा मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे.नाशिकच्या राजगड येथील मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यानी सावरकर यांच्या नावाचा उल्लेख न करणाऱ्या संमेलन नियोजन समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाव देण्याची मागणी देखील यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.दरम्यान या संदर्भात संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना भेटून मागणी करणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असून देखील त्यांचा नावाचा उल्लेख न केल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक संकटानंतर अखेर येत्या डिसेंबर महिन्यात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार आहे

. पण या संमेलना आधीच आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाव संमेलन गीतांमध्ये उल्लेख न केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. संमेलन आणि वाद हे काय नवीन नाही अनेक संमेलनाच्या आधी अशा प्रकारे नावावरून वाद झाल्यास देखील पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे ही परंपरा नाशिकमध्ये सुद्धा कायम राहिली आहे. येत्या दोन दिवसात आमच्या या मागणी संदर्भात विचार न केल्यास आम्ही स्वागतच अध्यक्ष छगन भुजबळ यांची भेट घेऊन आमच्या भावना व्यक्त करणार असल्याची भूमिका देखील नाशिक मनसेच्या वतीने घेण्यात आली आहे.त्यामुळे या या नावावरून आता भुजबळ आणि संमेलन समितीचे सदस्य काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.