छटपूजेवर बंदी पोलीस आयुक्तांचा निर्णय

सार्वजनिक ठिकाणी छटपूजा साजरी करण्यास नाशिक मध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे.नाशिकच्या गोदाघाट, रामकुंड,पंचवटी परिसरात उत्सव साजरा न करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक शहरातील कुठल्याही नदी,तलाव किनारी पूजा करण्यावर बंदी असेल.दिनांक १० नोव्हेंबर व ११ नोव्हेंबर रोजी होणारि छटपूजा सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास मनाई करण्यात आल्याने उत्तर भारतीय नागरिकांमध्ये नाराजी आहे.

घरीच थांबून साध्या पद्धतीने छट पूजा साजरी करण्याचे आव्हान पोलीस आयुक्तांच्या वतीने करण्यात आली आहे. दरवर्षी नाशिकचा ऐतिहासिक रामकुंड परिसरात उत्तर भारतीय नागरिक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात. तसेच गोदावरी काठी छटपूजा करत हे नागरिक प्रार्थना करतात. नाशिक मध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास आहे.या छटपुजेच्या निमित्त हे सर्व नागरिक नाशिकच्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरात एकत्र येऊन एकमेकांना भेटत देखील असतात. सार्वजनिक ठिकाणी या उत्सावावर बंदी घातल्याने नागरिकांमध्ये नाराजी देखील आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा चा संसर्ग असल्याने सर्व उत्सवांवर बंदी होती. आता कोरोना चा संसर्ग कमी झाले असले तरी धोका मात्र अद्याप कायम आहे त्यामुळे पोलिस आयुक्तांनी हे निर्बंध घातल्याचं बोलले जात आहे. आता आयुक्तांच हे निर्बंध उत्तर भारतीय नागरिक पाळतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.