घरात घुसून बिबट्याचा हल्ला.

नाशिकच्या इगतपुरी येथे घरात शिरून बिबट्याने एका इसमावर हल्ला केला केल्याची घटना समोर आली आहे.इगतपुरी येथील सह्याद्री नगर येथे हि घटना समोर आली आहे.नारायण निकम असे या बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव असून त्यांच्यावर रेल्वे हॉस्पिटल येथे अधिक उपचार सुरु आहे.


सिद्धार्थ नगर येथे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने नारायण निकम यांच्या घरातील पडवीत प्रवेश केला होता, रॅक पडण्याच्या आवाजने निकम हे बघण्यासाठी पडवीत गेले असता अवघ्या दोन ते तीन फुटाच्या अनंतरावर असलेल्या बिबट्याने निकम यांच्यावर झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला,बेसावध असलेल्या निकम यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने निकम यांना आपल्या तावडीतून सोडून तेथून धूम ठोकली.या हल्य्यात नारायण निकम हे गंभीर जखमी झाले आहे,त्यांच्या शरीराच्या विविध भागावर बिबट्याने हल्ला केल्याने जखमा झाल्याय.निकम यांचा पाय फॅक्चर असताना देखील त्यांनी बिबट्याला प्रतिकार करत आपला जीव वाचवला आहे.

या घटनेने परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरून एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता, तर घरासमोर खेळत असलेल्या मुलावर बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.त्याच पाठोपाठ प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता थेट घरात घुसून माणसांवर हल्ला करत असल्याने इगतपुरी येथील नागरिक हे मोठ्या भीतीच्या सावटाखाली आहे.तर वनविभागाने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

त आहे.