नाशिकच्या अंबड परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दिनांक ८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अंबड पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल कारण्यातर आला आहे.
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. विशेष बाब म्हणजे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाने आत्महत्या करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.नेमकं त्याने अश्याप्रकारे आत्महत्या करण्यामागचे कारण काय त्यादिशेने देखील पोलीस तपास करत आहे. प्रथमेश प्रकाश बोरसे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अंबडजवळील निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात प्रथमेशने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण पुढे आलेले नाही.मात्र ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.