नाशिक मध्ये सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रमुख मागणी घेऊन या आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे..जोपर्यंत आमची ही प्रमुख मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघे घेणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनि घेतल्याने प्रवाशांचे मात्र हाल होताना पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या दिवशी मात्र एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एकही बस बाहेर जाऊ देणार नाही अशी आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतली आहे वेळ पडली तर तोडफोड करण्याची तयारी देखील या कर्मचाऱ्यांनी ठेवल्याने हा आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता देखील आहे.
आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा देखील संपला पाठिंबा मिळत आहे.मनसे आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आज पंचवटी येथील आंदोलन ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांना आपला पाठींबा दर्शवला तसेच यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही देखील रस्त्यावर उतरू असा इशारा या नेत्यांनी दिला.