नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांवर प्रशासक

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील (Nashik dsitrcit) २९ डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या सहा नगरपरिषदांवर (Municipal Council) प्रशासक नियुक्त (administrator) केले जाणार आहेत. तसे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सध्या जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ४९ जागांसाठी निवडणूक (Elections) झाली असून, सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. मात्र, या सहा नगरपरिषदां निवडणूक कार्यक्रम न होता सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मनमाड (Manmad), सिन्नर (Sinnar), येवला(Yeola), नांदगाव (nandgaon), सटाणा (satana) आणि भगूर (Bhagur) नगरपरिषदांची मुदत आज दि. २९ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता लगेच निवडणूक होतील का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र वाढता कोरोना पाहता लगेच जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सहाही नागरपरिषदांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. मनमाडच्या नगरपरिषदेवर डॉ. विजयकुमार मुंढे (Vijayakumar Mundhe), सिन्नर अर्चना पठारे (Archana Pathare), येवला सोपान कासार (Sopan Kasar), नांदगाव विवेक धांडे (Vivek Dhande), सटाणा बबन काकडे (Baban Kakde) आणि भगूर येथे वर्षा मीना (varsha Meena) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या (Nagarpanchayat Election) ८७ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान झाले. सुरगाणा (suragana) आणि पेठ (Peth) नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण (OBC Reservation) नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व १७ जागांवर निवडणूक होत आहे. निफाड(Niphad) आणि दिंडोरी नगरपंचायतीत (Dindori Nagarpanchayat) १४ जागांवर, देवळा येथे फक्त ११ जागांवर निवडणूक होतेय. या ठिकाणी ५ जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील ११ ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना २९ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. १० जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे १८ जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र १९ जानेवारी रोजी लागेल.