गंगापूरनंतर आता दारणा धरणातून थेट जलवाहिनी योजना

नाशिक । प्रतिनिधी

आता नाशिकरोड भागातील शुध्द पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. शुध्द आणि कमी खर्चात शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविली होती. त्यानंतर अलीकडच मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजन कार्यान्वित झाली आहे.

नाशिक शहराला सुमारे ६०० दश लक्ष घन फूट पाणीपुरवठा रोज करण्यात येतो. यात गंगापूर आणि मुकणे धरणातील पाण्याचा समावेश आहे. दारणा धरणातून पाणी उपसा करण्याचे काम महापालिकेने थांबवले आहे. दारणा धरणातून येणारे पाण्याचे हेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. मात्र बंधाऱ्याच्या अलीकडेच अनेक गावे आणि कॅन्टोमेंट बोर्ड आणि अन्य काही आस्थापनांचे मलयुक्त पाणी प्रकीयेशिवाय नदीपात्रात सोडले जात असल्याने हे पाणी दूषित होते. हे पाणी इतके प्रदूषित असते कि त्याचे शुद्धीकरण करण्यात अडथळे येतात. आणि नाशिकरोड भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो. दारणा धरणातून पाणी कमी होत गेल्यानंतर यासंदर्भात अशाप्रकारे प्रदूषण वाढत असल्याने महापालिकेला पावसाळा सुरु होऊन धरणातून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यावर हि समस्या कमी होते. त्यामुळे तीन महिने तरी चेहेडी बंधाऱ्यातून पाणी उपसा करणे बंद असते.

२०२० च्या नोंव्हेबर पासून तर बंधाऱ्यातून पाणी घेऊन त्याचा पुरवठा करण्यास स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने या धरणातून ४००दश लक्ष घनफूट आरक्षण असूनही केवळ १३ डॅश लक्ष इतकेच पाणी वापरले गेले. त्यामुळं आता मनपाने प्रदूषण होणाऱ्या बंधाऱ्याच्या वरील बाजूस जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतलं होता. मात्र थेट दारणा धरणातून पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला आहे.