Home » कसबे सुकेणेत आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणेत आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

निफाड तालुक्यात सुकेणे येथे आज पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर बबत्याला बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आले आहे.

कसबे सुकेणे येथील सतीश मोगल यांच्या शेतातील विहिरीत पाण्याच्या शोधार्थ असलेला बिबट्या पडला. हि बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाची तीळ घटना दाखल झाल्यांनतर त्यांनी क्रेनच्या साहाय्याने पिंजरा विहरीत टाकण्यात आला. काही तासानंतर बिबट्या अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला.

याच आठवड्यात १४ फेब्रुवारी रोजी कसबे सुकेणे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यांनतर ही दुसरी घटना आहे. म्हणजेच आठवड्यात दोन घटना झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

यावेळी जेरबंद बिबट्याला नपिचड येथील रोपवाटिकेत आणून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनील नेवखे, वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदशनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!