Home » ‘विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी’, नारायण राणेंचे खळबळजनक ट्विट

‘विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी’, नारायण राणेंचे खळबळजनक ट्विट

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी
मंत्री नारायण राणे हे नेहमी वक्तृत्व शैलीमुळे माध्यमात चर्चेत असतात. आताही त्यांनी एक खळबळजनक ट्विट केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी (दि.१५) स्फोटक पत्रकार परिषदेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. आता यामध्ये भाजपचे मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी खासदार विनायक राउत यांना उद्देशून एक ट्विट केले आहे.

नारायण राणे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली, त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली, त्यांचीही चौकशी परत होईल, एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

या खळबळजनक ट्विटमध्ये खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. तर सुशांतसिंग राजपूत प्रकरणाविषयी खळबळजनक ट्विट केले आहे. त्याचबरोबर मातोश्रीला देखील या माध्यमातून इशारा दिला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!