Home » नाशिक डबल मर्डर केसमधील रेंज रोव्हर ‘या’ अभिनेत्याची

नाशिक डबल मर्डर केसमधील रेंज रोव्हर ‘या’ अभिनेत्याची

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील बहुचर्चित कापडणीस मर्डर मिस्ट्री मध्ये आणखी एक ट्विस्ट आला असून संशयित राहुल जगतापाने खरेदी केलेली कार हि एका बॉलिवूड अभिनेत्याची असल्याची उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.

गंडगंज संपत्ती हडप करण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने नियोजनबद्धरीत्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा पुत्र डॉ. अमित कापडणीस यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप याने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कर पोलिसांनी गुरुवारी शोधून काढली. मात्र या या प्रकरणा संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

दरम्यान या डबल मर्डर नंतर राहुल जगताप याने रेंज रोव्हर खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. मात्र आरोपी राहुल जगतापने खरेदी केलेली आलिशान गाडी जॉन अब्राहिमची असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द संशयित आरोपी राहुल जगताप याने हि माहिती पोलिसांना दिल्याचे तपासात समोर आले आहे. बापलेकांच्या हत्येनंतर त्यांच्या पैशांतून राहुल जगतापने रेंज रोव्हर खरेदी केल्याचे आढळले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून आरटीओच्या माध्यमातुन गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

तर पोलिसांच्या मिळालेल्या स्विफ्ट कारचा आरटीओ नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे समोर आले आहे. कारण या क्रमांकाची नोंद वाहन पोर्टलवर शेव्हरोले सेल या मॉडेलच्या कारची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मारुती कारच्या चेसीज क्रमांकावरून सूत्रे फिरवून आरटीओकडून तिचा मूळ नोंदणी क्रमांकासह मालकाची माहिती मागविली आहे. तर राहुल जगतापणे खरेदी केलेल्या रेंज रोव्हर या गाडीचा मालक अभिनेता जॉन अब्राहम असल्याचे सांगितले. आणि या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!