Home » शिवजयंती निमित्त साकारलेल्या वाघनखे आणि कट्यार दिमाखात अनावरण

शिवजयंती निमित्त साकारलेल्या वाघनखे आणि कट्यार दिमाखात अनावरण

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
कित्येक दिवसांपासून नाशिककरांना या वाघनखे आणि कट्याराच्या दर्शनाची आतुरता होती अखेर आज या वाघनखं आणि कट्याराचे अनावरण करण्यात आलं असून आज सकाळी साडेअकरा वाजेपासून या दोन्हींचे दर्शन सीबीएस जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात घेता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी वेगवेगळ्या भव्य प्रतिकृतीच्या माध्यमातून विश्वविक्रम करणाऱ्या छत्रपती सेनेतर्फे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या वाघनखे याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. यामध्ये १३१ किलो वजन आणि पाच फूट रुंदीची वाघनखे सोबतच ९२ किलो वजनाची आणि ०८ फूट रुंदीची कट्यार साकारण्यात आली आहे.

छत्रपती सेनेने साकारलेल्या या वाघनखे आणि कट्यार यांची वंडर बूक ऑफ रेकॉर्ड्सने विश्वविक्रम म्हणून नोंद केली आहे. वंडर बूकच्या टीमचे प्रतिनिधी अॅमी छेडा यांच्या उपस्थितीत पाहणी आणि मोजणीनंतर नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र, पेहेराव भव्य स्वरुपात जगासमोर मांडायची अशी छत्रपती सेनेची यामागे संकल्पना असून २४ कामगारांच्या अहोरात्र मेहनतीनंतर ही वाघनखे आणि कट्यार तयार झाली आहे. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीचं आकर्षण ही विश्वविक्रमी वाघनखे आणि कट्यार असणार हे नक्की..

छत्रपती सेनेतर्फे या आधी २०१९ मध्ये शिवाजी महाराजांचा १३ फूट उंच जिरे टोप, २०२० मध्ये १३१ किलो वजनाची १३ फूट लांब भवानी तलवार २०२१ मध्ये ७१ किलो वजन असलेला शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला टाक साकारण्यात आला होता. या सर्वांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!