प्रेमिकाच्या मृत्यनंतर तिच्या मृतदेहाशी केला विवाह

By : Pranita Borse

श्रद्धा आणि आफताब प्रकरण ऐकल्यानंतर अनेकांचा प्रेमावरून विश्वास डगमगला असेल. प्रेमात एवढ्या क्रूरपणे हत्या होत असेल तर विश्वास डगमगण साहजिक आहे. मात्र प्रार्थना आणि बिटुपन यांची प्रेमकहाणी ऐकल्यावर (Love Story) कदाचित प्रेमावरचा तो विश्वास पुन्हा बसेल. ते म्हणतात ना प्रेमाला सीमा नसते. तसच काहीसं प्रेम बटूपनने प्रार्थनाशी केले. त्याने आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी, आपल्या मृत प्रेयसीची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रेयसीच्या मृतदेहाशी लग्न केले. एवढेच नाही तर त्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथही घेतली. त्याच्या निर्णयामुळे हिंदीमधील “जिंदगी और मौत से परे है प्यार” या ओळीचा प्रत्यय येतो.

ही प्रेमकहाणी आसाममधील आहे. बटूपन या तरुणाच्या कहाणीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. बटूपन ज्याने आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी समाजाचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्याने आपल्या मृत प्रेयसीची मागणी पूर्ण करून केवळ लग्नच केले नाही, तर आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथही घेतली. प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करणारा नाही तर तिच्या मृतदेहाशी तिच्या इच्छेसाठी लग्न करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेयसीच्या मृतदेहाशी लग्न करून तिच्या मृतदेहापाशी ढसाढसा रडणारा हा प्ररियकर प्रेमाची खरी व्याख्या सांगणारा आहे.

त्याने लग्न केलं आणि ढसाढसा रडला


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आसामच्या छोट्या गावांतील रहिवासी बिटुपन (२७ वर्ष) आणि प्रार्थना बोरा (24 वर्ष) हे अनेक दिवसांपासून प्रेमात होते. दोघांच्या कुटुंबियांना ही गोष्ट माहित होती. त्याचं जीवन आनंदात चाललं होतं. मात्र नियतिला काही दुसरच मंजूर होतं. प्रार्थना दीर्घकाळापासून आजारी होती. तिला गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असतना प्रार्थना बोराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी बिटुपनला कळताच त्याला मोठा धक्का बसला. तो तिच्या घराच्या दिशेने निघाला तिच्या घरी पोहोचला ढसाढसा रडला आणि मग तिची वधू बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या मृतदेहाशी लग्न केले आणि पुन्हा तिला जवळ घेऊन हंबरडा फोडला.

बिटूपनला रडताना पाहून प्रार्थनाच्या कुटुंबियांना तिथे उपस्थित सर्वांनाच अजूनच गहिवरून आलं. सगळ्यांचे डोळे त्याच्या प्रेमाला पाहून पाणावलेले होते. या प्रेमकहाणीला पाहून “सगळे कसाई नसतात काहीकाही “बिटूपन’ पण असतात,” असंच म्हणावं लागेल.