उद्योग आपल्या दारी! पहिल्याच दिवशी करोडोंची गुंतवणूक

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह येथे नाशिक ‘आयमा इंडेक्स २०२२’ चे उदघाटन आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. आयमा इंडेक्सच्या माध्यमातून ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी झाली आहे. या सर्व उद्योजकांचे स्वागत केले.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती, हिरा नंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, रंजन ठाकरे, आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष वरूण तलवार, सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,मनीष रावल, सूर्यभान नाईकवाडे,सुदर्शन डोंगरे, सेक्रेटरी योगिता आहेर, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या एक्झिबिशन मध्ये तीनशे हुन अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच नाशिक शहराला चांगलं हवामान लाभलं असून नाशिक हे मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असेल तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येऊन नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे.

नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण तयार केले. नाशिकमध्ये एचएएलच्या माध्यमातून ओझर येथे विमानतळ विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पहिले उत्कृष्ट असे विमानतळ विकसित करण्यात आले आहे, असे यावेळी भुजबळ म्हणाले.

आयमा इंडेक्सच्या माध्यमातून करोडो रुपयांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी झाली आहे. या सर्व उद्योजकांचे स्वागत आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी केले आहे. तसेच चार दिवस सुरू असलेल्या या एक्झिबिशन मध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.. त्यामुळे या चार दिवसीय आयमा इंडेक्स २०२२ एक्झिबिशन मध्ये आपण सहभाग नोंदवून नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घ्यावी..