अक्षय निकाळजे यांनी आज नाशिक पोलिसांत जबाब नोंदवण्यासाठी पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली होती.आपल्यावर करण्यात आलेले आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसून,आमदार कांदे हे पोलिसांची देखील दिशा भूल करत असल्याचे निकाळजे यांनी यावेळी म्हंटले आहे.
अक्षय निकाळजे आणि सुहास कांदे यांच्या प्रकरणाबाबत अक्षय निकाळजे हे आज नाशिक पोलीस आयुक्तलयात दाखल झाले होते.काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांची ,शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी चौकशी केली होती.त्यानंतर आज अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवला जाणार होता.त्यासाठी आज नीकाळजे यांनी नाशिक पोलिसांत जबाब नोंदविण्यासाठी हजेरी लावली होती.भुजबळां विरोधातील याचिका मागे घेण्यासाठी अक्षय निकाळजे यांनी धमकी दिल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता.अक्षय निकाळजे यांनी याआधी गंगापूर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदविला आहे.त्यातच या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलीस आयुक्तांनी निकाळजे यांना चौकशीसाठी बोलवले होते.अक्षय निकाळजे यांना नाशिक पोलीस आयुक्तालयात चार तारखेला जबाबा साठी हजर राहण्याचा समज बजाविण्यात आला होता.मात्र दिवाळीच कारण देत अक्षय निकाळजे आठ तारखेला म्हणजे आजरोजी नाशिक पोलीस आयुक्तांना जबाब देण्यासाठी हजर राहिले होते.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांच्यात डीपीडीसीच्या निधी वाटपावरून वाद सुरु आहे.या वादावरून सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.या प्रकरणातून मला अक्षय निकाळजे कडून फोन करून हि याचिका मागे घेण्यासाठी धमकी दिली गेलयाचा आरोप आमदार कांदे यांनी केला होता.आमदार कांदे आणि अक्षय निकाळजे यांच्यातील वादाच्या प्रकरणाबाबत लवकरच पोलीस आयुक्त निर्णय घेणार आहे.तर कांदे यांच्याकडून माजी बदनामी झाली आहे.तर मी कांदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून कांदे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसून ते पोलिसांची देखील दिशाभूल करत असल्याचा आरोप निकाळजे यांनी केला आहे.
तर पोलिसांच्या संपूर्ण तपासानंतर काय अहवाल समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.अक्षय निकाळजे हा अंडरवल्ड दोन छोटा राजन याचा पुतण्या असल्याचे देखील म्हंटले जातेय.