“हेल्मेट नाहीतर सहकार्य नाही” हेल्मेट सक्तीचा आता तिसरा टप्पा.

“हेल्मेट नाही तर सहकार्य नाही” या हेल्मेट सक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिक शहरात आज पासून सरकारी कार्यालय आणि शिक्षण संस्था यांमध्ये हेल्मेट नसेल तर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये.


पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरात हेल्मेट सक्तीसाठी आधी नो हेल्मेट नो पेट्रोल ,त्यानंतर नो हेल्मेट समुपदेशन आणि आता या यानंतर आता नो हेल्मेट “नो कुओप्रेशन” ही मोहीम राबविण्याचे ठरवले आहे,या मोहिमेची आज पासून नाशिक शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. आजपासून शासकीय , निमशासकीय कर्मचाऱयांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे,जर यापैकी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान केले नसेल तर त्यांना त्यांच्या संबंधीत कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाहीये.

शासकीय,निमशासकीय अस्थापनां सोबत शिक्षण संस्थांवर देखील या मोहिमेंतर्गत पोलिसांची करडी नजर असनार असून शासकीय कार्यालयांच्या आवारात पोलीस हेल्मेट तपासणी देखील करणार आहे,तर पेट्रोल पंप प्रमाणे देखील शासकीय कार्यालयांच्या आवारात पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहे.”हेल्मेट नाही तर सहकार्य नाही” अशी नवीन टॅगलाईन घेऊन हा हेल्मेट सक्ती मोहिमेचा हा तिसरा टप्पा असणार आहे.त्यामुळे शहरात नाशिक पोलिस हेल्मेट सक्तीची कठोर अमलबजावणी करणार असल्याने हेल्मेट सक्तीचे उल्लंणघन करणाऱ्यांना पोलिस कार्यवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे..