नाशिक । प्रतिनिधी
रशिया युक्रेन युद्धामुळे अद्यापही अनेकजण मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. अशातच नाशिकमधील काही युद्धामुळे अडकून होते. मात्र हे सर्व आता सुखरूप घरि पोहचल्याचे नाशिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेन या दोन देशात युद्ध सुरु असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच स्थानिक नागरिक देखील देश सोडून पळत आहेत. असे असताना युक्रेनमध्ये शिक्षणासाठी अनेक भारतीय विद्यार्थी या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे युद्धामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकाराकडूनच करण्यात येत आहे. यासाठी नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले १६ विद्यार्थी नाशिकला परतले आहेत.
नाशिकचे (Nashik) एकूण २० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी 16 विद्यार्थी मायदेशी परतले असून, त्यांचे अक्षरशः वाजत-गाजत वरात काढून स्वागत करण्यात आले. आपल्या काळजाचा तुकडा आलेला पाहून आई-वडिलांच्या आनंदाला पारावार नव्हता. उरलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोघे दिल्लीला पोहचणार असून, उर्वरित दोघे परतीच्या मार्गावर आहेत, तर आदिती देशमुख, मखमलाबादचा रोहन उंबरे, राजीवनगर येथील सागर चव्हाण हे देखील पोहचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रशियाने २४ फेब्रुवारीपासून युक्रेन घशात घालण्याचे प्रयत्न सुरू केले असून हे युध्द अद्यापही सुरु आहे. त्यामुळे अडकून असेलल्या विद्यार्थ्यांबाबत काळजी लागलेली होती. अखेर काही स्थनिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करून या सर्कवांची सुटका केली आहे. त्यामुळे हे सर्वच विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत आहेत.