इंदुरीकर महाराजांनी यूट्यूबर्सना दिला ‘हा’ शाप

नाशिक । प्रतिनिधी

कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या डायलॉग्समुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी एका कीर्तनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

‘माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तर यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी माझ्या भाषणांचे व्हिडिओ परवानगी घेतल्याशिवाय यूट्यूबवर अपलोड करून नका, असा इशारा दिला होता. आता त्यांनी त्यांच्या किर्तनाचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणाऱ्या यूट्यूबर्संना या माध्यमातून चांगलीच चपराक दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=QN2DOPqUUKc

दरम्यान अकोल्यातील कौलखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत ०४ हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. त्यांच्यामुळे मी सतत अडचणीत येत आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील.’ त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी इंदुरीकर महाराज अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अडचणी वाढण्याचं कारण त्यांनी यूट्यूबर्स असल्याचे सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी पुत्रप्राप्ती संबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आता यूट्यूबर्स संदर्भात केलेल्या नवीन वक्तव्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.