Home » नाशिकमधील विद्यार्थ्याला फ्रांस-इटलीत प्रवेश देण्याच्या नावावर तीन लाखांना गंडा

नाशिकमधील विद्यार्थ्याला फ्रांस-इटलीत प्रवेश देण्याच्या नावावर तीन लाखांना गंडा

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

परदेशात शिक्षणासाठी ऍडमिशन तसेच व्हीसा स्कॉलरशिपचे सर्व प्रोसेस पुर्ण करून देण्याच्या नावाखाली नाशिकमधील एकाला तीन लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

प्रवेश, नोकरी आदींच्या नावावर आजही सुशिक्षित बेरोजगारांना फसवणुकीच्या घटना समोर येतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. येथील पंचवटीत राहणाऱ्या नारायण दगु शिंद यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. शिंद यांचा मुलगा प्रितेश हा शहरातील इंग्लिश लर्निंग अकॅडमी अँन्ड स्टडी ऍब्रॉड कन्सलटन्सी येथे शिकतो. यावेळी या संस्थेच्या पदाधिकारी रागिनी प्रफुल्ल सोमठाणकर यांनी शिंद यांच्या मुलाचे ऍडमिशन करून देण्याच्या बहाण्याने हि फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फ्रांस व इटली येथील शिक्षणासाठी ऍडमिशन तसेच व्हीसा स्कॉलरशिपचे सर्व प्रोसेस पुर्ण करून देण्याचे कबुल केले. हे प्रवेश करून देण्यासाठी फिर्यादी यांचे कडुन वेळोवळी वेगवेगळया तारखेस टप्याटप्याने गुगल पे व ऑनलाईन पद्धतीने एकुण ०२ लाख ८० हजार रूपये घेतले. मात्र शिंद यांच्या मुलाचे परदेशात ऍडमिशनचे काही एक प्रोसेस केली नाही.

दरम्यान शिंद यांनी याबाबत ऍडमिशन बाबत विचारले असता संशयित सोमठाणकर यांनी सांगितले की तुमच्या मुलाचे ऍडमिशन रिजेक्ट झाले आहे त्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाही. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिंद यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बटयानी गंगापूर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!