Home » Video : प्रचाराला पैसे दिले नाही म्हणून एकावर धारदार शस्त्राने हल्ला

Video : प्रचाराला पैसे दिले नाही म्हणून एकावर धारदार शस्त्राने हल्ला

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत उमद्वाराचा प्रचार करण्यासाठी पैश्यांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने,सहा ते सात जणांच्या टोळक्याने निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमद्वाराच्या भावाला धार धार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना जुने नाशिक भागातील नानावली येथे समोर आली आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाेन्ही गटांविराेेधात परस्परविराेधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत फिर्यादी आणि पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नानावली अमर धाम रोड येथे राहणारे समीर रफिक शेख यांचा भाऊ बबलु रफिक शेख हे प्रभाग २० मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही त्यांना मदत करू. त्याकरिता आम्हाला ३ लाख रुपये द्या, असे सांगितल्यावर समीर यांनी नकार दिला. त्यानंतर संशयित समीर बादशहा, रियाज, याकूब शाह, फिरोज अंसारी, आतिक अंसारी, शाहदाब शेख, इमरान कुरेशी आदींच्या टोळक्याने शस्त्राने समीरवर हल्ला करून जखमी केल्याचे म्हंटले आहे…

दरम्यान दुसरी तक्रार समीर बादशहा यांची आई बिस्मिल्ला शेख गयासाेद्दीन यांनी दिली आहे. संशयित पप्पी, बबलू, गुड्ड्या, बुटक्या यांनी समीरसह त्याच्या साथीदारांना शिवीगाळ करुन हाणामारी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांनी दाेन्ही गटांची समजूत काढली. तर घटनेतील संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली असून याबाबत भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!