नाशिक महापालिकेच्या सदस्यांचा अखेरचा राम राम घ्यावा!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिकचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्या अगोदर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अखेरची निरोपाची महासभा बोलावली आहे. महापौर निवासस्थान रामायण येथे ही ऑनलाईन महासभा होणार आहे.

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक ची मुदत (दि. १४) मार्च रोजी संपुष्टात संपुष्टात येत आहे. यंदा वेळेत निवडणुका न झाल्याने १४ तारखेपासून मनपात प्रशासकीय राजवट लागू होणार आहे, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यंदा निवडणुका महिना दीड महिना उशिराने होणार की लांबणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु विद्यमान पंचवार्षिक चा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्या अगोदर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अखेरची निरोपाची महासभा बोलावली आहे. महापौर निवासस्थान रामायण येथे ही ऑनलाईन महासभा होणार आहे.

मावळत्या महापौरांची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच नवीन महापौर विराजमान होण्याच्या परंपरेला यंदा खंड पडणार आहे. विद्यमान स्थितीत नियमानुसार निवडणुका होऊन त्यांचा निकाल घोषित होऊन आतापर्यंत नूतन महापौर उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया साठी हालचाली होणे अपेक्षित होते, मात्र यंदा निवडणुकात लांबल्याने १५ मार्च रोजी विराजमान होऊ घातलेले महापौर-उपमहापौर कधी विराजमान होतील हे सांगणे अवघड झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात सज्ज झाली आहे, मात्र अद्याप कशातच काही नसल्याची स्थिती आहे. त्याच राज्य शासनाने प्रभागरचना रद्द करून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केल्याने अनिश्चितता अधिकच वाढली आहे.

येत्या गुरुवारी होणारी महासभा मावळत्या सदस्यांसाठी अखेरची असून यातच निरोपाचा नारळ दिला जाणार आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे हि सभाही ऑनलाईनच होणार आहे.