Home » एटीएम फोडणाऱ्या म्होरक्यासह दरोडेखोरांची टोळी जेरबंद

एटीएम फोडणाऱ्या म्होरक्यासह दरोडेखोरांची टोळी जेरबंद

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
सप्टेंबर २०२१ मध्ये कोणार्क येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या परंतु हा प्रयत्न फसल्यानंतर पलायन करणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

आडगाव पोलिसांनी ही कामगिरी केली असून या संशयित आरोपींना उत्तरप्रदेश येथील ककराला येथून अटक करण्यात आली आहे. मात्र या टोळीतील एक जण फरार झाला आहे.

आडगाव जवळील कोणार्क नगर येथे सप्टेंबर २०२१ सयाजी पॅलेस जवळील कस्तुरी ज्वेलर्स वर दरोडा टाकण्याच्या तयारीत एक टोळी होती. पोलिसांची चाहूल लागताच सदरच्या गाडीसह हत्यार सोडून पळून गेले होते.

दरम्यान आडगाव पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. परंतु काही केल्या त्यांचा तपास लागत नव्हता. काही दिवसांपूर्वी सदर संशयित आरोपी हे ककराला (ता. दातागंज जि. बदायूँ उत्तर प्रदेश) या भागात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार आडगाव पोलिसांनी एक पथक तयार करून उत्तर प्रदेश कडे रवाना केले होते.

सदर पथकाने या संशयित आरोपींना ककराला (ता. दातागंज जि. बदायू) येथे शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. फहिमबाबू समशेर खान, झिशान खान उर्फ इर्शाद खान, रफत अली उर्फ पप्पू अश्रफ अली, तेहजीब आलम उर्फ फरसाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान या टोळीतील एक साथीदार अद्याप फरार असून यातील तेहजीब आलम ऊर्फ फरसाद कल्लू खान हा सराईत आरोपी असून आंतरराज्य बँक एटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यांमधील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून अटक केलेल्या संशयित आरोपींना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!