जुन्या नाशकात मुलीचा घरात घुसून विनयभंग

नाशिक । प्रतिनिधी
तीन वर्षांपासून मागे लागलेल्या एका संशयित आरोपीने मुलीचा विनयभंग कल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रितम ठाकरे (वय २१), रा. अमरधाम रोड असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील तीन वर्षापासुन फिर्यादी कॉलेज ते घरी येत-जात असतांना फिर्यादी यांचा पाठलाग करून करत असे. तसेच मोबाईल व्दारे मॅसेज व कॉल करून त्रास देण्याचे सुरु होते. अशातच (दि.०७) वाजेच्या संशयित प्रीतम याने संबंधित मुलीच्या घरात फिर्यादी यांचा हात धरून माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याबरोबर लग्न कर असे बोलून तिचा विनयभंग केला. या घटनेची तक्रार पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान यावेळी संशयिताने संबंधित मुलीचा हात धरून माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याबरोबर लग्न कर असे बोलून तिचा विनयभंग केला. यानंतर त्याचे खिशात असलेली बॉटल मधील लिक्वीड पिवून मरण्याची धमकी देवून त्रास दिला, यामुळे संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.