Home » लिव्ह इन रिलेशनमधून पुन्हा एक संतापजनक घटना आली समोर

लिव्ह इन रिलेशनमधून पुन्हा एक संतापजनक घटना आली समोर

by नाशिक तक
0 comment

लिव्ह इन रिलेशनशिपमधून अनेक धक्कादायक गुन्हे समोर येत आहेत. अशात पुन्हा एक वेदनादायक घटना समोर आली आहे. मुंबईमध्येव रिलेशनशिप पार्टनरने किरकोळ कारणावरून वाद घालत महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फणसवाडी या परिसरातील ही धक्कादायक बाब आहे.

१८ दिवसांपूर्वीच म्हणजे १३ जानेवारी रोजी या महिलेवर हा अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. दरम्यान आज १८ दिवसांनंतर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिची मृत्यू सोबत सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे. या हल्ल्यात महिला अत्यंत गंभीर जखमी झाले ५० टक्के भाजली गेली होती.

याआधीही लिव इन रिलेशनशिप मधून अशा वेदनादायक घटना घडल्याचे आपण पाहिले आणि ऐकले आहे. दरम्यान पुन्हा एक असाच संताप जनक प्रकार समोर आला आहे. असून केवळ जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेवर अ‍ॅसिड ने तिच्या लिविंग रिलेशनशिप पार्टनर कडून हल्ला करण्यात आला होता. यात ही महिला पन्नास टक्के भाजली होती. त्यानंतर उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत माळवली आहे.

विशेष बाब म्हणजे थोड्या थिडक्या नाही तर तब्बल 25 वर्षंपासून सदर महिला आणि संशयित आरोपी हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. दरम्यान त्याने तिच्याकडे जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने तिच्यावर सल्फरिक ऍसिडने हल्ला चढवला. ज्यामध्ये महिला ५० टक्के भाजली गेली होती. याबाबत महिलेच्या मुलाने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. १० जानेवारी रोजी दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर संतापात सदर संशयित आरोपीने १३ जानेवारीला तिच्यावर अ‍ॅसिडने हल्ला केला आणि आज तिचा मृत्यू झाला आहे.

महिलेवर रुग्णालयात तब्बल १८ दिवस उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यामुळे तिला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात देखील आलं होतं. मात्र अखेर तिची ही झुंज अयशस्वी ठरली आहे आणि लिव इन रिलेशनशिप मधून अजून एक वेदनादायक प्रकार समोर आला आहे.

एखादं अविवाहित असलेलं जोडपं तरुण तरुणी किंवा कोणतेही दोन लोक परस्पर संमतीने एकत्र राहू शकतात. भारतीय कायद्यात ते पूर्णपणे कायदेशीर आहे. भारतीय कायदा याला बेकायदेशीर मानत नाही. मात्र या संबंधातून अनेक गुन्हेगारी घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!