भाजपची गाडी सुसाट, पंजाबमध्ये आप आघाडीवर; उत्तराखंडमध्ये चुरशीची लढत

नाशिक । प्रतिनिधी

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश वगळता चारही राज्यांमध्ये काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना ‘तैनात’ केलं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपा १५० जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने १५० जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पक्ष ८२ जागांवर आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून आघाडीवर
पोस्टल मतमोजणीनुसार सुरुवातीच्या कलांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यदेखील त्यांचा मतदारसंघ सिरथूमधून आघाडीवर आहेत.

पंजाब मध्ये आप ची बहुमताजवळ वाटचाल; ५४ जागी आघाडी
पंजाब मध्ये आप ची बहुमताजवळ वाटचाल होताना दिसत आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ते ५४ जागी आघाडीवर आहेत.

गोवा मध्ये साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंट ४३६ मतांनी पिछाडीवर असून उत्पल पर्रिकर देखील पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरूद्ध कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी आघाडीवर आहेत.

विशेष ठळक घडामोड

यूपी निवडणूक निकाल: आघाडीवर असलेले प्रमुख उमेदवार

गोरखपूर अर्बनमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत
सपा नेते अखिलेश यादव करहालमध्ये आघाडीवर आहेत
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथमध्ये आघाडीवर आहेत
फाजील नगरमध्ये सपाचे स्वामी प्रसाद मौर्य आघाडीवर आहेत

पंजाब निवडणूक निकाल:
अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योतसिंग सिद्धू आघाडीवर आहेत
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा पिछाडीवर आहेत
मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत
होशियारपूरच्या मुकेरियनमधून सरबजीत सिंग साबी २०१ मतांनी आघाडीवर आहेत..

दरम्यान हि सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी असून वेळोवेळी या ठिकाणी अपडेट देत राहू..