AssemblyElectionUpdates : पाचही राज्याचे आतापर्यंत निकालाचे कल, पहा कोणता पक्ष वरचढ

नाशिक । प्रतिनिधी

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.

गोव्यात ४० जागांसाठी मतमोजणी सुरु असून आता पर्यत काँग्रेसने लीड घेतला आहे. काँग्रेस आता १५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या मतदारसंघात, सांकेलीममध्ये पिछाडीवर आहेत.
बीजेपी १४, काँग्रेस १५, महाराष्ट्रवादी गोमंतक ०५,

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी ,मतमोजणी सुरु असून बहुमतासाठी ५९ जागांची आवश्यकता असते.
आप ८६, काँग्रेस १६, बीजेपी ०३, शिरोमणी अकाली दल ०८ अशी येथील आतापर्यतची आकडेवारी आहे.

उत्तरप्रदेशच्या मजमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. इथे भाजपने १०० जागांवर आघाडी घेतली आहे. तर, समाजवादी पक्षाने ४६ जागांवर आघाडी घेतल्याचे समजते आहे.
भाजप-११६, समाजवादी पक्ष-५५, अपना दल-०६, काँग्रेस-०४ अशी सद्यस्थिती आहे.

उत्तराखंड मधील स्थिती
बसपा ०२, बीजेपी २६, काँग्रेस १८,

दरम्यान सद्यस्थितीत भाजपचे पारडे जाड असून पंजाबमध्ये मात्र आप ने आघाडी घेतल्याचे दिसून येत.

सदर आकडेवारी हि इलेक्शन कमिशन इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईट वरून घेतलेली आहे…हि आकडेवारी दहा वाजेपर्यत ची आहे.