घरफोडी करणाऱ्या सराईताला गावठी कट्ट्यासह अटक

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकरोड पोलीसांनी १ गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसांसह आरोपीस अटक करून १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा खर्जुल सर्कल व सिन्नर फाटा परिसरामध्ये आलेला असुन त्याच्या जवळ बंदुकीसारखे हत्यार असल्याची खात्रीलायक माहीती गुप्त बातमीदारामार्फत नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी खर्जुल सर्कल या ठिकाणी साध्या वेषात जावुन सापळा रचला होता,त्यानंतर सदर ठिकाणी सराईत गुन्हेगार राहुल दिलीप धोत्रे हा त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकलवर मिळुन आला त्यांनतर पोलीस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडती मध्ये एक गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुस व पल्सर मोटार सायकल असा एकुण १ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असल्याचे पोलिस तपासात समोर आले असल्याच नाशिकरोड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे….