Home » पिंपळगाव बसवंत येथे १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, संशयितास अटक

पिंपळगाव बसवंत येथे १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, संशयितास अटक

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नराधमास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथे वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर ओळखीचा फायदा घेत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शकील शब्बीर पिंजारी असे संशयित आरोपीचे नाव आहे. याने मुलीला वेळोवेळी धमक्या देत अत्याचार केला. ‘जर तू ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान ही बाब मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने नातेवाईकांसह पिंपळगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित नराधमाविरोधात बाल लैंगिक प्रतिबंध अंतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!