धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच देवळा तालुक्यात एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लोहोनेर येथील एका तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एकीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरु असतांना या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील हि घटना आहे. लोहोणेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच दरम्यान मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र सदर मुलामुळे हि स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान या घटनेत युवक गंभीर भाजला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. यानंतर संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. युवक ५५ टक्के भाजला असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनि सांगितले आहे. या प्रकरणी देवलळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.