शनिवार, जून 3, 2023
घरअपघातनाशिकच्या सीबीएसजवळ अपघात, बसच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिकच्या सीबीएसजवळ अपघात, बसच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील सीबीएस जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

नाशिकहून नंदुरबार कडे जाणाऱ्या (एमएच १५ बीएल ३४४५) क्रमांकाची एसटी बसने एका २१ वर्षीय महिलेला नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सीबीएसच्या सिग्नलवर रस्ता ओलांडत असतांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वैशाली गायकवाड असे या मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. हि तरुणी सीबीएस येथील सिग्नल परिसरात रस्ता ओलांडत असतांना बस स्थानक मधून बाहेर पडलेल्या बस खाली ही युवती सापडली.

जखमी अवस्थेत या युवतीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे..

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप