Home » मुंबईतला तो फ्लॅट अन मंत्री बच्चू कडूंना दोन महिने कारावास

मुंबईतला तो फ्लॅट अन मंत्री बच्चू कडूंना दोन महिने कारावास

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अमरावतीमध्ये चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. कोर्टाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड आणि 2 महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू यांनी मुंबईत ४२ लाख रुपयांच्या मालकीचा फ्लॅट असून तो २०१४ विधानसभा निवडणुकीच्या वेळेस फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा त्यांच्यावर आरोप होता. २०१७ मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. बच्चू कडू यांनी या प्रकरणातील आरोप फेटाळले होते.

राजयोग सोसायटीने आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे ४० लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले, पण कर्ज परतफेड करू न शकल्याने चार महिन्यांच्या आधीच ते घर विकल्याचा दावा बच्चू कडूंनी केला होता. त्यामुळे सर्व आरोप खोटे होते, असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी २०१७ मध्ये दिले होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!