Home » मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून ‘त्या’ वडाची दखल

मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून ‘त्या’ वडाची दखल

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

अखेर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी नुकतीच मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या फोनद्वारे चर्चा केली आहे. आणि सदर प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा नव्याने करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल दरम्यान होणाऱ्या उड्डाण पुलासाठी अडीचशे वर्ष जुन्या असलेल्या वादाच्या झाडाची कत्तल करण्यात येणार होती. या पार्श्वभूमीवर नाशिककर एकवटले होते. कालपासून सोशल मीडियावर या संदर्भात मोहीम सुरु होती. याचबरोबर नाशिक मनपाच्या अधिकृत हँडलवर तक्रारींचा पाऊसही पडला होता. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही ट्विटच्या माध्यमातून पर्यावरण प्रेमींनी या घटनेची माहिती दिली.

अखेर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून याबाबतच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून हे कळवले आहे. ते या ट्विटमध्ये म्हणतात कि, ‘मी नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी बोललो आणि त्यांना प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाईनची पुनर्रचना करण्याची विनंती केली. पहिल्या आराखड्यात येथील २०० वर्षे जुने झाड कापावे लागणार होते, त्याचबरोबर ४५० हुन अधिक इतर झाडे तोडावी लागली असती. मात्र आता या जुन्या वटवृक्षासह त्यामधील मंदिराचे जतन होणार आहे.’

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!