स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान पाईप लाईन फुटली, दुकानांत पाणीच पाणी

नाशिक । प्रतिनिधी

स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना पाईप लाईन फुटल्याने थेट इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र नाशिक शहरात बघायला मिळाले आहे.

सध्या नाशिकमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक तसेच बाजापेठांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान नाशिकमधील पंचवटी कारंजा भागात स्मार्ट सिटी चे काम सुरू असताना पाईप लाईन फुटल्याने दुकानांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. नाशिकमध्ये चालू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांचा शहरातील दुकानदारांना आधीच फटका बसतो आहे. त्यात आता दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील साहित्याच देखीलं नुकसान झालंआहे.

दरम्यान सकाळी सकाळी दुकाने उघडण्याची वेळ असल्याने अशातच दुकानाच्या दारात पाणी आल्याने यावेळी दुकान मालकांची तारांबळ उडाली. परिणामी दुकान सुरु करण्याच्या वेळेत त्यांना दुकानातील पाणी काढण्याची वेळ आली. यावेळी सर्व दुकानदारांनी विरोध करीत काम थांबविण्यास सांगितले. मात्र सध्या हे काम सुरूच असून दुकानदार दुकानातील पाणी काढण्यात व्यस्त होते.

स्मार्ट सिटीच चालू असेलेलं हे काम बऱ्याच दिवसांपासून वादात आहे आहे. रस्ते खोदून ठेवल्यामुळे नुकसान होत असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी याआधी याबाबत आंदोलन केले होते, मात्र तरीही हे कामं लवकर होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.