Video : लोक अवयवदान का करत नाही? नाशिक शहर सर्वात मागे!

नाशिक । प्रतिनिधी

अवयव दानाबद्दल आपण सर्वजण ऐकून असाल. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याच देखील आपण ऐकलं असेल. मात्र अवयव दानाबद्दल खरच लोकांना कितपत माहिती आहे अणि माहिती असेल तरी कितीजण अवयव दान करतात हा देखील मोठा प्रश्न आहे. नाशिक शहरात गेल्या वर्षभरात फक्त चार ते पाच लोकांनी अवयव दान केले. या तुलनेत पुणे-मुंबईसारख्या शहरांचा जर विचार केला तर नाशिक शहर हे अवयव दान करण्यात फार मागे आहे.

अवयवदानाविषयी समाजात मोठे गैरसमज आहेत, आपल्या मृत्यूनंतर या अवयवांच्या माध्यमातून आपण कुणाला जीवदान देऊ शकतो, ही भावना महत्त्वाची आहे. दरम्यान याबाबत नाशिक येथील डॉ. संजय रकिबे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवयव दानाबद्दल समाजात जनजागृती करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अवयव दानाबद्दल लोकांना विविध माध्यमातून जागं करण्याच समाजोपयोगी काम करत आहेत. या विषयाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची धडपड डॉ. रकिबे सतत करतात. जिवंत व्यक्तीही अवयवदान करू शकतो, किडनी, यकृताचा काही भाग, कॅन्सर रुग्णांसाठी बोनमॅरो या अवयवांचे दान जिवंत व्यक्ती करू शकतो, तर मेंदूमृत व्यक्ती ३६ लोकांना जीवन देऊ शकतो असेही डॉ. रकिबे यांनी स्पष्ट केले.

डॉ. रकिबे यांची अवयवदानाबद्दल माहिती :

https://www.youtube.com/watch?v=p2zxe2JLQx0

डॉ. संजय रकिबे यांनी क्रिकेट, गणेशोत्सव, एनएसएस कॅम्प, नवरात्रोत्सव, बाईक रॅली, पोलिस मार्गदर्शन, जेष्ठ नागरिक संघ या सर्व माध्यमांतून ग्रामीण भागात, सटाणा, कळवण, दिंडोरी, निफाड, पिंपळगाव मालेगाव, तळेगाव सारख्या तालुका स्तरावर, एमव्हीपी कॉलेज सह अनेक मेडिकल कॉलेज अवयव दानाबद्दल मार्गदर्शन केले आहे. मात्र अवयव हवे असणाऱ्यांच्या तुलनेत अजुनही त्याचं दान करणारे अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहे.आणि अनेक जणांना तर अजुनही देहदान आणि अवयवदान यातील फरकही लक्षात येत नाही. अवयव दान महत्त्व कळतं. मात्र हे महत्त्व सर्वांनाच पटणं..आणि अवयव दानाचा हा आकडा वाढणं गरजेचं असल्याचे ते म्हणतात.

कुठलाच धर्म दानाला नाही म्हणत नाही, म्हणून अवयवदान करायला हवे. उत्तर महाराष्ट्राची गरज नऊ हजार डोळ्यांसाठीची आहे; पण वर्षात केवळ शंभर डोळे मिळतात. भारतात नेत्रदान झाले तर संपूर्ण जगाला आपण डोळे पुरवू शकू, असेही डॉ. रकिबे यांनी सांगितले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदान प्रक्रियेला काहीशी गती प्राप्त झाली आहे. जीवन अनमोल असून, समाजऋण फेडण्यासाठी अवयवदान करण्याची मानसिकता तयार करा, असे भावनिक आवाहन डॉ. रकिबे यांनी केले.