ViralVideo : पेट्रोल-डिझेल परवडत नाही, औरंगाबादच्या तरुणाची भन्नाट आयडिया

मुंबई | प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. यामुळे पेट्रोल डिझेल देखील परवडत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच औरंगाबाद (Aurangabad) येथील तरुणाने नामी शक्कल लढवली आहे.

औरंगाबादच्या या तरुणाने पेट्रोल डिझेल परवडत नसल्याने ऑफिसला ये जा करण्यासाठी चक्क घोड्याचा वापर सुरु केला आहे. शेख युसूफ (Aurangabad Man Shaikh Yusuf) असे या तरुणाचे नाव आहे. दररोज तो आपल्या ‘जिगर’ (Jigar Horse) नावाच्या घोड्यावर बसून कामाला जात असल्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावरही ( Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओमुळे युसूफ आणि त्याच्या ‘जिगर’ घोड्याबाबद्दल परिसरात कुतुहल निर्माण झाले आहे.

साभार : ANI

औरंगाबाद येथील शेख युसूफ सांगतो की, तो आपल्या ‘जिगर’ या घोड्यावर बसून कामाला जातो. “मी ती लॉकडाऊनच्या काळात विकत घेतला होती. माझी बाईक चालू नव्हती, त्यातच पेट्रोलचे दर प्रचंड वाढले होते आणि सार्वजनिक वाहतूकही सुरु नव्हती. त्यामुळे तेव्हाच निर्णय घेऊन प्रवासासाठी मी हा घोडा ४० हजार रुपयांना विकत घेतला होता. मी आता प्रवासासाठी गाडी न वापरता घोडाच वापरतो’, असे तो सांगतो.

आता महागाई आणि इतकी वाढली आहे की सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीही आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा घोडा काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.