विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रविण दरेकर यांनी मजूर असल्याचे भासवत मुंबै बँकेचे (Mumbai Bank) हजारो ठेविदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणुक केली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच आरोपावरुन आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे (AAP Dhananjay Shinde) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दरेकर यांच्यावर केलेल्या आरोपात धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पाठिमागील अनेक वर्षांपासून मुंबई बँकेचे ठेवीदार आणि सरकारची फसवणूक करत आहेत. आपण मजूर असल्याचे ते बोगसपणे दाखवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 2014 ते 2019-20 या काळात ते मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दरेकर यांची मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली.

तसेच धनंजय शिंदे यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते.

२०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.