वो बुलाता है मगर जानेका नै, लॉलीपॉप देगा मगर खानेका नै..!

नाशिक । प्रतिनिधी
एसटी कर्मचारी अद्यापही आपल्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरण झालेच पहिजे, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. अशी भूमिका नाशिकमधील एसटी कर्मचाऱ्यांनी फलकबाजीतून दाखवली आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ६३ दिवस उलटून गेले असून अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्‍न झाले. निलंबन, सेवासमाप्ती, बदल्यांतून दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडत नसल्‍याची सध्याची स्‍थिती आहे. तर आजपासून थेट एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी ची कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आगारात फलक बाजीतून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ‘

यामध्ये ‘वो बुलाता है, मगर जानेका नै, लॉलीपॉप देगा मगर खानेका नै, त्याचप्रमाणे अजित पवार यांनी ‘सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

या वक्तव्याचा निषेध म्हणून देखील फलकबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून अद्यापही अनेक कर्मचारी संपात सहभागी असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या मोठ्या वक्तव्यानंतरही राज्यातील अनेक आगारांमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.