राज्य कृषिमंत्र्यांच्या गावी कांदा लागवड मोबाईल टॉर्चवर!

नाशिक । प्रतिनिधी
मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जवळपास दोन तासापासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन (Agitation) अखेर स्थगित (Postponed) करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर भाजपचे आंदोलन (BJP Agitation) मागे घेण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना (Farmers) दिवसा वीज पुरवठा करावा त्याचप्रमाणे थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला वीज पुरवठा (Light Connection) त्वरीत सुरळीत करावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. rahul Aher) हे आज शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवत रास्ता रोको केला. दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी लावून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना घाम फोडला. यावेळी आमदार डॉ. आहेर म्हणाले कि, राज्याच्या कृषि मंत्र्याच्या तालुक्यात मोबाईलच्या टॉर्चवर कांद्याची लागवड (Onion Cultivation) करावी लागते, हे राज्याचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडायला कोणाला वेळ नाही, तिकडे सिने अभिनेत्याला साप चावला तर त्याचा इतका उहापोह केला मात्र शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला समजत नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की आता कोणाला ही आम्ही सोडणार नाही, सत्ताधाऱ्यांच्या शेतात पाणी गेलं तर त्यांना लगेच भरपाई मिळते आणि आम्हाला नाही मिळत असं का? आता ज्या अधिकाऱ्याने पैसे मागीतले तर त्याच्या तोंडाला काळ फासा, अनेक अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असून असच सुरू राहील तर त्यांचं बर वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान या आंदोलनावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आश्वासन देत सर्व प्रश्न येत्या ८ ते १५ दिवसात सोडवण्याचे दिले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. जवळपास दोन तासापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबई – आग्रा महामार्ग ठप्प झाला होता. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले अन वाहतूक सुरळीत झाली.