मोठी बातमी! ओबीसी आरक्षणसंदर्भात आता बांठीया कमिशन, पहा भुजबळ काय म्हणाले…

नाशिक । प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण संदर्भात बांठीया कमिशन नेमले असून आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे, त्यामुळे आरक्षणबाबत सरकारकडून कमिशन येत्या २ ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्री भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरक्षणाबाबत म्हणाले कि, ओबीसी आरक्षणासाठी नव्याने बांठीया कमिशन नेमले आहे. हे कमिशन या मुद्द्यावर काम करणारा असून त्यांचे काम देखील सुरू झाले आहे, त्यामुळे आरक्षणबाबत सरकारकडून कमिशन येत्या २ ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. तर प्रभाग रचना राज्य सरकार तयार करून निवडणूक आयोगाला देणार असून त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी फडणवीसांना टोला लगावतांना म्हणाले कि, महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, हे भक्कम सरकार असून ते पाडण्याच्या नादात जाऊ नका. तिकडे उत्तर प्रदेशात भाजपचे ५० आमदार कमी झाले, अन त्याच ठिकाणी विरोधक जर एकत्र होऊन लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असत. त्यामुळे लाट कमी होताना दिसत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील याबाबत प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्षासंदर्भात ते म्हणाले कि, राज्यपालांकडे विनंती पत्र पाठविले आहे, त्यानुसार राज्यपालांनी आदेशित केलं होतं की लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष असावा, मात्र राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. तसेच हायकोर्टाने देखील तशा सूचना दिल्या असल्याचे भुजबळांनी सांगितले.