Video : मंत्री डॉ. भारती पवार यांनी महिलांबरोबर गायली होळीची गाणी!

नाशिक । प्रतिनिधी
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आला आहे. होळीच्या दिवशी त्यांनी महिलांसोबत गाणी गात त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.

केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार नेमी आपलॆ साधेपणाच्या स्वभावामुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी एका उसाच्या गाड्यावर थांबून गुऱ्हाळ चालविल्याचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. कारण हि असच आहे. कोपरगाव दौऱ्यावर असताना त्यांनी एका गावात थांबून महिलांसोबत होळीचा सण साजरा केला आहे.

सगळीकडे होळीच्या उत्सवाचे उधाण आले आहे. अशातच केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार होळी सणासाठी घरी निघाल्या होत्या. मात्र उशीर झाल्याने रस्त्यात लागणाऱ्या गावातच थांबल्या. निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे थांबत विलास मत्सागर यांच्या घरी भेट दिली. तसेच त्यांनी होळीच्या पारंपरिक उत्सवात सहभाग घेतला. यावेळी उत्सवात सहभागी असणाऱ्या महिला होळीचे गाणं गात असताना पार यांनी देखील सहभाग घेत होळीचे गाणे गेले. यावेळी उपस्थित सर्वजण चकित झाले.

दरम्यान डॉ. भारती पवार या कोपरगाव दौऱ्यावर गेलेल्या असतांना नाशिकला यायला उशीर होत असल्याने रस्त्यात पिंपळस रामाचे या गावात थांबल्या. या ठिकाणी थांबून त्यांनी होळीचा सण साजरा केला. डॉ. भारती पवार यांचा होळी उत्सवाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून केंद्रीय मंत्र्यांच्या साधेपणाचे कौतुक देखील केले जात आहे.