नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहराने पात्रता पूर्ण केली असून, १०० टक्के निर्बंध हटवायला हरकत नाही, असं प्रधान सचिव यांनी सांगितले आहे. मात्र एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक जिल्हा कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांतपासून नाशिक शहरातील रुग्णसंख्या कमालीची घटली असून यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नाशिकमधील निर्बंध हटवण्याबाबत शहरात चर्चा होती. अखेर आज यावर पडदा पडला असून भुजबळांनी येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी ते म्हणाले कि, नाशिक शहराने क्रायटेरिया पूर्ण केली असून, १०० टक्के निर्बंध हटवायला हरकत नाही, असं प्रधान सचिव यांनी सांगितले आहे. मात्र एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र धोका टळला नसून सर्वानी मास्क लावण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना गेला अस समजू नका, चीन मध्ये तीन कोटी रुग्ण लोक लॉकडाऊन झाले आहेत, त्यामुळे नाशिकमधील निर्बंध हटविण्याबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, जिल्ह्यात फक्त ७४ कोरोना रुग्ण असून कोव्हिडं रिलीफ फ़ंड साठी १५ हजार २३३ प्रस्ताव आले असून त्यापैकी ९६६४ प्रस्ताव मंजूर
झाले तर ४४८६ प्रस्तावांची तपासणी सुरु आहे. १०८३ प्रस्ताव नामंजूर केले आहेत. लसीकरणावर भर देताना ते म्हणाले कि, लसीकरण पहिला डोस ८४ टक्के झाला असून दुसरा डोस ६२ टक्के झाला आहे. नाशिक मनपात पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त आहे तर दुसरा डोस ७२ टक्के पेक्षा जास्त नागरिकांचा झाला आहे.
दरम्यान आज होणाऱ्या दाजीबा वीर मिरवणुकीसाठी परवानगी मिळाली असून यासोबत रंगपंचमी, रहाडीला देखील परवानगी आहे. त्यामुळे नाशिककरांना आनंदाची बातमी मिळाली असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.