बापरे..! नाशकात महिलेने रस्त्याच्या कडेलाच दिला २ जुळ्या मुलींना जन्म

आज दुपारी बारा -साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवटीतील औदुंबर नगर, अमृतधाम येथील रस्त्यावरून मोलमजुरी करणारी एक गरोधर महिला जात असताना त्या महिलेच्या पोटात प्रसूती कळा सुरू झाल्याने ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली व तेथेच डिलिव्हरी झाली. हि बाबा परीसरातील महिलांच्या लक्ष्यात आल्यानंतर परिसरातील महिलांनी व नागरिकांनी जवळच असलेले डॉ.राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांना फोन केला त्यांतर डॉ .राजेंद्र बोरसे तात्काळ ज्या ठिकाणी महिला डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी धाव घेतली व त्या महिलेची बाकी डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली .


तोपर्यंत माजी नगरसेविका प्रियंका माने या प्रभागात असलेल्या मनपा आरोग्य केंद्र डॉ.बेस्ते व दोन महिला परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनात तात्काळ घेऊन सदर महिला ज्या ठिकाणी डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी पोहोचल्या व पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर यांना फोन करून डॉ.राजेंद्र बोरसे यांचे बोलणे करून दिले डॉ. राजेंद्र बोरसे यांनी घडलेला प्रकार डॉ.विजय देवकर यांना सांगितला.


ॲम्बुलन्स बोलवून महिलेला इंदिरा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले डिलिव्हरी झालेल्या महिलेचे शितल विकी कांबळे असे नवा असून त्या महिलेने दोन जुळ्या मुलीना जन्म दिला आहे तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्या मुली या सुखरूप आहे. यावेळी या महिलेसाठी माजी नगरसेविका प्रियंका माने आणि डॉक्टर राजेंद्र बोरसे. यांनी तत्परता दाखवून पुढील उपचारासाठी सहाय्य केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं